नवी दिल्ली – बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीला पंचायतीने अजब शिक्षा केली आहे. पंचायतीने आरोपीला उठाबशा काढायला लावले आणि नंतर सोडून दिले. बिहारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हिडिओमधील नराधमनीने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देतो असं सांगून एका अज्ञात स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यावरून पंचायतीने आरोपीला पोलिसांच्या हवाली न करता स्वतः त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. पंचायतीने आरोपीने अल्पवयीन मुलीला केवळ अज्ञात स्थळी नेलं असं सांगून शिक्षा दिली. शिक्षेमध्ये देखील आरोपीला केवळ काही उठाबशा काढायला लावून सोडून देण्यात आले.याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला अजब शिक्षा
पंचायतने पाच उठाबशा काढायला लावत आरोपीला सोडून दिलं pic.twitter.com/q3xRsamkLp
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) November 25, 2022
बिहारच्या नवदा जिल्ह्यातील कन्नौज गावातील हा प्रकार आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकरी देखील याबाबत तीव्र संताप व्यक्त करताहेत. पोलीस अधीक्षकांनी मात्र यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच हे प्रकरण दाबण्याचा आणि मिटवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असलयाचे समजते.