Dhurandhar Movie Trailer : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा केली जात होती. अखेर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रॅाकी और रानी की प्रेमकहाणी या चित्रपटानंतर रणवीर तब्बल चार वर्षानंतर पुन्हा एकदा धुरंधर चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर रणवीरच्या चाहत्यांनाकडून त्याची प्रशंसा केली जात आहे. प्रत्येक दृश्यात दमदार डायलॉग फुल्ल पॅक अॅक्शन पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांसारख्या कलाकारांच्या अत्यंत महत्वाच्या आणि लक्षवेधी भूमिका आहेत. तमिळ अभिनेत्री सारा अर्जुन या चित्रपटात रणवीरच्या गर्लफ्रेंडच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीर सिंहचा ‘धुरंधर‘मधील लुक खूपच खतरनाक आहे. त्याच्या लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. खरंतर ट्रेलरची सुरूवात अभिनेता अर्जुन रामपालपासून होते. त्यानंतर टीझरमध्ये ज्या पद्धतीने पात्रांची तोंड ओळख करण्यात आली होती. तशाच पद्धतीने ट्रेलरमधून पात्रांची खोली दाखविण्यात आली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. रणवीर आपल्या चाहत्यांना दरवेळी काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न करत असतो. या चित्रपटातही त्याचा एक वेगळा लूक आणि भूमिका प्रेक्षकांना वेड लावणार असल्याची चर्चा सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सवरून लक्षात येते. ‘धुरंधर’ हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, रणवीरला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आदित्य धर यांनी आर्टिकल 370’ आणि ‘धूम धाम’ या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक केले आहे. ते आता एका मोठ्या स्केलवरील धुरंधर चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हेही वाचा : “आम्ही शेख हसीनाच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध…” ; बांगलादेश न्यायालयाच्या निर्णयावर संयुक्त राष्ट्रांनी काय म्हटले? वाचा