Dhurandhar Sequel : आज बहुप्रतिक्षित अभिनेता रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर धुरंधर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंह याने मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केले आहे. अशातच धुरंधरच्या टीमने सिक्वलची घोषणा केली आहे. सिक्वलची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. धुरंधरचा सिक्वल १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आता दुसऱ्या भागात कथा कशी पुढे जाते, तसेच चित्रपटातील कलाकारांमध्ये कोणते बदल केले जातील हे पाहणे महत्वाचे असणार आहे. धुरंधर हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. बॅाक्स अॅाफिसवर चित्रपट मोठी कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील सर्वच कलाकारांचे काम आवडले आहे. रणवीर सिंगच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, चित्रपटाचा तीन तासांपेक्षा जास्त कालावधी प्रेक्षकांसाठी निराशाजनक ठरला आहे, याबाबत प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंह व्यतिरिक्त संजय दत्त, अक्षय खन्ना, आर माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. हेही वाचा : “भारत तटस्थ नसून जागतिक शांततेच्या बाजूने” ; द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन