मुंबई – रोहित शेट्टीचा चित्रपट म्हंटल की डोळ्यासमोर उभी राहते गाड्यांची तोडफोड,हिरो व्हिलनची मारधाड आणि बरच काही. सिंघम,गोलमाल अशा सुपरहिट चित्रपटांची माळ लावल्यानंतर आता रोहित शेट्टी एक धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. ज्याचं नाव आहे सर्कस. नाव जितकी अतरंगी आहे तितकेच यातील सर्व पात्र देखील अतरंगी आहेत. नुकतच या चित्रपटाच मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आल. जे की खूप इंटरेस्टिंग वाटत आहे.
सर्कस चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहून तुमचे हसू थांबणार नाही. पोस्टरमध्ये रणवीरपासून ते जॅकलिनपर्यंत सर्व स्टार्सच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम कॉमेडी वाटत आहेत. पोस्टर खूपच मजेदार असल्यामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटात मराठमोळा सिद्धार्थ जाधव देखील आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये असल्याचे पोस्टरमध्ये पाहायला मिळते.
View this post on Instagram
‘सर्कस’ या कॉमेडी चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये रणवीर सिंग, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, जॉनी लीव्हर, मुरली शर्मा, सुलभा आर्य यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट कॉमेडी अंदाजात दिसत आहे. ही पोस्ट रिलीझ होताच रोहित शेट्टीपासून ते जॅकलीनपर्यंत सर्वांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. पोस्टर पोस्ट करत लिहिले आहे- ‘एका आठवड्यानंतर ‘सर्कस’चा ट्रेलरही रिलीज होईल. आतापुरत, रोहित शेट्टीच्या सर्कस कुटुंबाला भेटा.