बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह हा लॉकडाऊनच्या दरम्यान भलेही सिल्वर स्क्रीनपासून दूर असला, तरी सोशल मीडियावर तो खूप ऍक्टिव्ह होता. आता चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे; परंतु निर्मात्यांनी रणवीरच्या आगामी “83′ चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकली आहे. हा चित्रपट आता पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
सध्या रणवीर आपल्या अन्य एका चित्रपटाची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. त्याने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यात रणवीर हा स्टायलिश लूकमध्ये दिसून येत आहे. यानंतर रविवारी त्याने आणखी एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली की, “तिरछी रोशनियों तले फिर वापस आ गया हूं.’ यानंतर रणवीरचे आणखी काही फोटो फॅन पेजवरून समोर आले आहेत. ज्यामध्ये रणवीर सिंह आपली बॉडी तयार करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण रणवीरच्या यादीमधील अनेक चित्रपट अद्याप वेटिंगमध्ये आहेत. अशा परिस्थितीत बहुधा त्याच्या आगामी चित्रपटाची चाहुल चाहत्यांना लागली आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणवीर सिंह “83′ या चित्रपटाशिवाय “सूर्यवंशी’, “जयेशभाई जोरदार’ आणि “तख्त’ यासारख्या चित्रपटात झळकणार आहे. “सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असून “जयेशभाई जोरदार’चेही अनेक पोस्टर रिलीज करण्यात आलेले आहे.