Ranji Trophy 2024-25 (Himachal Pradesh vs Uttarakhand) – धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर रविवारी उत्तराखंड विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात हिमाचल प्रदेशने अव्वल चार फलंदाजांनी एका डावात शतके झळकावून केवळ दुसऱ्यांदा ही कामगिरी केली. हिमाचलकडून शुभम अरोरा (118), प्रशांत चोप्रा (171), अंकित कलसी (नाबाद 205) आणि एकांत सिंग (101) यांनी शतके झळकावली.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांच्यातील रणजी ट्रॉफी सामना शुक्रवारपासून म्हणजे 11 ऑक्टोबरपासून धर्मशाला येथे खेळवला जात आहे. उत्तराखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तो चुकीचा ठरला. हिमाचल प्रदेशने 3 बाद 663 धावा करत डाव घोषित केला.
संघाकडून अंकित कलसीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने द्विशतक झळकावले. 75 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना कलसीने 270 चेंडूत 205 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 20 चौकार मारले. हिमाचलच्या पहिल्या 4 फलंदाजांनी शतके झळकावली तर त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मयंक डागरनेही 56 धावांची नाबाद खेळी केली.
उत्तराखंड 364 धावांनी मागे
663 धावांच्या प्रत्युत्तरात उत्तराखंडला पहिला डावात फॉलोऑन देखील टाळता आला नाही. त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 299 धावांता बाद झाला. त्यामुळे आता, सामन्याच्या चौथ्या व पाचव्या दिवशी त्यांच्यासमोर 364धावा करण्याचे आव्हान असेल. अवनीश सुधाने संघाकडून आतापर्यंत सर्वाधिक 96 धावा केल्या. हिमाचल प्रदेशकडून दिवेश शर्माने 3 तर वैभव अरोरा, अर्पित गुलेरिया, मयंक डागर यांनी प्रत्येकी 5 बळी घेतले आहेत.