नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘राणी’ पुन्हा येतीये; महाराणीचा चौथ्या सीजनचा जबरदस्त टीझर रिलीज

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॅार्मवरील अल्पावधीच लोकप्रिय झालेल्या महाराणी सिरीजच्या नव्या म्हणजेच ४ सीजनचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी जिने या सिरीजमधील राणी भारती ही व्यक्तीरेखा साकारलेली आहे. ती पुन्हा एकदा महाराणी सीजन ४ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामुळे प्रेक्षकांत या सिरीजविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सिरीजमधून बिहार राज्यातील राजकारण दाखविण्यात आले आहे. सिरीजमध्ये राणी भारती बिहारची मुख्यमंत्री दाखविण्यात आले आहे. या टीझरमध्ये “काहीजण तिला अशिक्षित म्हणतात, काही खुनी, तर काही त्यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणतात. त्यानंतर हुमा म्हणते की, त्यांना राजकारणापेक्षाही आपल्या कुटुंबाप्रती प्रेम आहे, आणि बिहारच तिचं कुटुंब आहे. आणि कोणी जर माझ्या बिहारला नुकसान पोहोचवण्याचा विचार करत असेल, तर संपूर्ण राजकारणात उलथापालथ करुन टाकू…” असे एक वाक्य राणीभारती बोलताना दिसते.
अशी राहिलीय महाराणीची जर्नी
या सिरीजचा टीझर जरी रिलीज करण्यात आला असला तरी महारणी ४ ही वेबसिरीज कधी रिलीज होणार याविषयी माहिती मिळू शकलेली नाही. महाराणी ४ ही वेबसिरीज 2021 मध्ये सोनी लिव्हवर प्रसारित झाली होती. या शोमध्ये हुमा कुरेशीने राणी भारतीची भूमिका साकारली होती. जी एक साधी आणि अशिक्षित गृहिणी होती.
तिचा नवरा भीमा (सोहम शाह) जखमी झाल्यानंतर ती अचानक बिहारची मुख्यमंत्री बनते. मग याच आधारावर कथा पुढे कथा सरकत जाते. या वेबसिरीजचा दुसरा सीझन जुलै 2022 मध्ये आला होता, तर तिसरा सीझन गेल्या वर्षी मार्चमध्ये आला होता. पुनित प्रकाश दिग्दर्शित ‘महाराणी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

