Rani Mukerji | बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही ती तितक्याच ताकदीने चित्रपटांमध्ये अभिनय करते. चाहतेही तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतात. यातच आता तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तिने ‘मर्दानी’ या चित्रपटाद्वारे सर्वांना आश्चर्यचकित केले. आता या चित्रपटाचा तिसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशराज फिल्म्सने शुक्रवारी याची घोषणा केली आहे.
राणी मुखर्जीने 2014 मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ चित्रपटात पोलीस अधिकारी शिवानी रॉयची भूमिका साकारली होती आणि तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मर्दानीचा दुसरा भाग 2019 मध्ये आला होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरले.
आता यशराज फिल्म्सने ‘मर्दानी3’ ची अधिकृत घोषणा केली आहे. राणी मुखर्जी पुन्हा एकदा धाडसी पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
YRF प्रमुख आदित्य चोप्रा निर्मित या चित्रपटाची निर्मिती 2026 मध्ये होणार आहे. YRF ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट केले, “प्रतीक्षा संपली आहे. मर्दानी ३ या चित्रपटात राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतणार आहे. यानंतर पुन्हा एकदा राणी मुखर्जीला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
हेही वाचा:
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी गेली दिल्लीकडे ; उद्या नागपुरात पार पडणार शपथविधी सोहळा