Rani Mukerji Mardaani 3: राणी मुखर्जीची बहुचर्चित चित्रपट मालिकेतील तिसरा भाग ‘मर्दानी 3’ अखेर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. याआधीचे दोन्ही भाग प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगलेच उचलून धरले होते. त्यामुळे ‘मर्दानी 3’ कडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. शुक्रवार, 30 जानेवारी रोजी हा चित्रपट सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ या मोठ्या बजेटच्या चित्रपटासोबतच प्रदर्शित झाला आहे. आधीच बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ ची जोरदार हवा असताना, शिवानी शिवाजी रॉयची म्हणजेच राणी मुखर्जीची एंट्री लक्षवेधी ठरत आहे. अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद ‘मर्दानी 3’ च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचा परिणाम अॅडव्हान्स बुकिंगवरही दिसून आला. उपलब्ध माहितीनुसार, सुमारे 39,056 तिकिटांची प्री-सेल झाली आहे. ब्लॉक सीट्स वगळता चित्रपटाने सुमारे 1.16 कोटी रुपयांची, तर ब्लॉक सीट्ससह सुमारे 2.33 कोटी रुपयांची अॅडव्हान्स कमाई केली आहे. Rani Mukerji पहिल्या दिवसाची कमाई किती? ‘मर्दानी 3’ हा चित्रपट फार मोठ्या बजेटचा नसून नियंत्रित खर्चात तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा बजेट मागील ‘मर्दानी 2’ पेक्षा जवळपास दुप्पट असल्याचं सांगितलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते, पहिल्या दिवशी हा चित्रपट 3 ते 3.5 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. सकाळच्या शोना चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही कमाई 4 कोटींपर्यंत पोहोचू शकते. वीकेंडला प्रेक्षकांची गर्दी वाढल्यास कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. स्टारकास्ट आणि दिग्दर्शन ‘मर्दानी 3’ मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात मल्लिका प्रसाद हिने मुख्य खलनायिका ‘अम्मा’ची भूमिका साकारली आहे. जानकी बोदीवाला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, तर मिखाइल यावलकर इन्स्पेक्टर बलविंदर सिंग सोढी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केलं आहे. आता ‘बॉर्डर 2’ च्या तुफानातही ‘मर्दानी 3’ बॉक्स ऑफिसवर किती टिकते, हे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असणार आहे.