राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवालमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना; व्हिडिओ तुफान व्हायरल

President Draupadi Murmu and Saina Nehwal | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालसोबत राष्ट्रपती भवनात बॅडमिंटन खेळताना दिसल्या. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी सायना नेहवालसारख्या दिग्गज खेळाडूलाही आपल्या खेळाने चकित केले. द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवाल यांच्यातील बॅडमिंटन सामन्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवाल यांच्यातील बॅडमिंटचा सामना चांगलाच रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामान्यादरम्यानचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया हँडल (X) वरूनही काही फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “द्रौपदी मुर्मू यांचे खेळाबद्दलचे प्रेम जेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये स्टार खेळाडू सायना नेहवालसोबत बॅडमिंटन खेळले तेव्हा दिसले. राष्ट्रपतींनी हे प्रेरणादायी पाऊल भारतीय बॅडमिंटनचा उदय लक्षात घेऊन उचलले आहे. ज्यात जागतिक स्तरावर महिला खेळाडू वैश्विक मंचावर मोठा प्रभाव टाकत आहे. ” President Draupadi Murmu and Saina Nehwal |
President Droupadi Murmu’s natural love for sports and games was seen when she played badminton with the much-celebrated player Ms. Saina Nehwal at the Badminton Court in Rashtrapati Bhavan. The President’s inspiring step is in keeping with India’s emergence as a badminton-power… pic.twitter.com/DGjRudbzSc
— President of India (@rashtrapatibhvn) July 10, 2024
पुढे त्यांनी लिहिले की, “पद्म पुरस्कार विजेत्यांना ‘उनकी कहानी-मेरी कहानी’ या व्याख्यानमालेचा एक भाग म्हणून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय खेळाडू सायना नेहवाल, उद्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात व्याख्यान देतील आणि प्रेक्षकांना बोलतील.” यापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते ड्युरंड कप फुटबॉल ट्रॉफीचे अनावरणही करण्यात आले होते. या स्पर्धेची ही 133 वी आवृत्ती आहे. ही स्पर्धा 27 जुलैपासून कोलकाता येथे सुरू होणार आहे. President Draupadi Murmu and Saina Nehwal |
#WATCH | President Droupadi Murmu played badminton with ace shuttler Saina Nehwal at the Badminton Court in Rashtrapati Bhavan, Delhi today.
(Video: Rashtrapati Bhavan) pic.twitter.com/sLmFqQSMtk
— ANI (@ANI) July 10, 2024
तर सायना नेहवालने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूसोबत बॅडमिंटन खेळतानाचा फोटो शेअर करताना लिहिले की, “हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस आहे. माझ्यासोबत बॅडमिंटन खेळल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.” दरम्यान, ऑलिम्पिक पदक विजेती भारताची शटलर सायना नेहवालला पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा :
निसर्गाचा कोप..! वादळी पावसामुळे डोंगर कोसळले, बद्रीनाथ महामार्ग पुन्हा बंद





