राणेंची अटक रास्तच; महाड कोर्टाने व्यक्त केले मत
Updated On:

महाड – महाडच्या कोर्टाने काल राणेंना जामीन मंजूर केला असला तरी त्या संबंधातील आदेशात कोर्टाने त्यांना करण्यात आलेली अटक वैधच होती, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यांच्याकडे तपास करण्यासाठी त्यांना कोठडी देण्याची गरज नसल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात येत आहे, पण त्यांच्यावर झालेली अटकेची कारवाई योग्यच होती, असे मतही कोर्टाने व्यक्त केले आहे.
काल रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत राणे यांना 15 हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर झाला असला तरी कोर्टाने त्यांना पोलीस हजेरी लावली आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी महाड पोलिसांपुढे हजर राहायचे आहे.
या प्रकरणातील कोणाला धमकावयचे नाही, पुराव्यात छेडछाड करायची नाही आणि यापुढे अशी वक्तव्ये करायची नाहीत, अशी समजही कोर्टाने राणेंना दिली आहे.


