मुंबई – ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘दे दे प्यार दे’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे लव रंजन हे आजच्या काळात प्रेम आणि नाते संबंधांना धरून आपल्या अनोख्या अंदाजसाठी ओळखले जातात. तसेच, त्यांच्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट कायम पाहायला मिळते ती म्हणजे सुंदर सेट्स आणि सुंदर आऊटडोर लोकेशन्स. अशातच, त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’ आज (8 मार्च) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. मात्र, प्रदर्शनाच्या काही तासांनंतर हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचं समजलं आहे. एका प्रसिद्ध संकेत स्थळावर हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या निर्मात्यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचं अंदाज वर्तविला जात आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवर सुद्धा याचा परिणाम होणार असल्याचं म्हंटलं आज आहे.
दरम्यान, ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट फिल्मीजिला, मूवीरूल्ज, टेलिग्राम, तमिळ रॉकर्स या साइट्सवर उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. एका प्रसिद्धीवृत्त वाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघेही पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहे.