रणबीर आणि आलिया एकाच कारणामुळे एका सिनेमात नाहीत

रणबीर आणि आलिया या जोडीची रिअल लाईफमध्ये खूप चर्चा होते आहे. त्यांना रील लाईफमध्ये एकाच सिनेमात एक्‍त्र आणण्यासाठी अनेक डायरेक्‍टरनी प्रयत्न केले आहेत. मात्र रणबीर आणि आलिया या दोघांनीही या प्लॅनला विरोधच केला आहे. लव रंजन यांच्या आगामी सिनेमात हे दोघे एकत्र असणार असे समजले होते. मात्र त्यालाही आलियाने विरोध केला आहे. या दोघांनी काही काळ तरी एकत्र काम करायचे नाही असे ठरवले आहे.

“ब्रम्हास्त्र’मध्ये हे दोघेही एकत्र असणार आहेत. त्यामुळे “ब्रम्हास्त्र’चे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत अन्य कोणत्याही सिनेमात एकत्र काम करण्याचा प्रस्ताव त्यांनी स्वतःहूनच दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अजून “ब्रम्हास्त्र’चे 150 दिवसांचे शुटिंग बाकी आहे. त्यामुळे सध्या तरी रणबीर आणि आलियाने एकत्र काम करणे अवघडच आहे.

आलियाचा “कलंक’ याच महिन्यात 19 एप्रिलला रिलीज होतो आहे. याशिवाय तिने राजमौलींच्या दिग्दर्शनाखाली “आरआरआर’ देखील स्वीकारला आहे. संजय लिला भन्साळीच्या आणखी एका सिनेमात काम करण्यास तिने तयारी दर्शवली आहे. मात्र हे सर्व सिनेमात तिच्याबरोबर रणबीर असणार नाही आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.