Ranabaali Movie: लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र! विजय-रश्मिका यांची ‘राणाबाली’मधून खास सरप्राइजची घोषणा
Ranabaali Movie ‘राणाबाली’ या चित्रपटाची निर्मिती मैत्री मूवी मेकर्स यांनी केली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या पोस्टरमध्ये मुलीचे हात एकमेकांत चेहेरे दिसत नसले तरी हे हात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचेच असावेत, असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

Ranabaali Movie: साऊथ सिनेमातील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे रिअल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर आता ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांच्या आगामी ‘राणाबाली’ या चित्रपटाच एक खास पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आल आहे.
‘राणाबाली’ या चित्रपटाची निर्मिती मैत्री मूवी मेकर्स यांनी केली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या पोस्टरमध्ये मुलीचे हात एकमेकांत चेहेरे दिसत नसले तरी हे हात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचेच असावेत, असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे. पोस्टरमध्ये ‘आमचे राणाबाली आणि जयम्मा’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
यासोबतच २८ फेब्रुवारी रोजी एक खास सरप्राइज देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. “एकदा पाहिल्यावर तुम्ही पुन्हा त्यांच्यावर प्रेम कराल,” असा भावनिक कॅप्शन देत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवण्यात आली आहे. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी हा पोस्टर प्रसिद्ध करण्यात आल्याने सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची जोडी यापूर्वी डियर कॉमरेड या चित्रपटात एकत्र दिसली होती. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘राणाबाली’मधून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘राणाबाली’ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल सांकृत्यान यांनी केले आहे. चित्रपटाची कथा रायलसीमा भागाच्या इतिहासावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. विजय देवरकोंडा ‘राणाबाली’ या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर रश्मिका मंदाना ‘जयम्मा’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
या चित्रपटात खलनायकाची भूमिका हॉलीवूड अभिनेता अर्नोल्ड वोस्लू साकारणार आहेत. त्यामुळे चित्रपटाला आंतरराष्ट्रीय रंगही लाभला आहे. भव्य सेट्स, दमदार कथा आणि लोकप्रिय जोडीमुळे ‘राणाबाली’कडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
‘राणाबाली’ हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. लग्नानंतर विजय आणि रश्मिका यांचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट असल्याने चाहत्यांसाठी तो विशेष ठरणार आहे. आता २८ फेब्रुवारीला कोणता सरप्राइज मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





