गोंदियात ठाकरे गटाची ताकद वाढणार ! माजी आमदाराने बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा पक्ष सोडायचा प्रयत्न केला तर?

Ramesh Kuthe to Shiv Sena । लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकून मोठा विजय मिळवला. त्यामध्ये, ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 9 खासदार निवडून आल्याने उद्धव ठाकरेंसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. याच यशाकडे पाहून पक्षात एंट्री करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. कारण आता, शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदाराने पुन्हा घरवापसी केली आहे. त्यामुळे, गोंदियातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
रमेश कुथे यांची अखेर शिवसेनेत घरवापसी Ramesh Kuthe to Shiv Sena ।
शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला.
रमेश कुथे हे 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर, मात्र 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला होता. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे, ते लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती. पण, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला असून त्यांचा आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
मी फक्त शिकायला गेलो होतो Ramesh Kuthe to Shiv Sena ।
दरम्यान, रमेश कुथे यांचा पक्षप्रवेश होताना उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रश्न विचारला. “मी शिवबंधन बांधतो, पण परत पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर?”, असा प्रश्न ठाकरेंनी विचारला होता. त्यावर, “मी पक्षासोबतच होतो, फक्त तिकडे शिकायला गेलो होतो”, असे उत्तर रमेश कुथे यांनी दिले.
हेही वाचा
अखिलेश यादव यांच्या मोहरा विधानावर केशव प्रसाद मौर्य म्हणाले,’मी नाही, तुम्हीच..’





