कोल्हापूर | चिरंजीव अजिंक्य देव यांनी रमेश देव यांची ‘ती’ अखेरची इच्छा केली पूर्ण…

Updated On:
कोल्हापूर | चिरंजीव अजिंक्य देव यांनी रमेश देव यांची ‘ती’ अखेरची इच्छा केली पूर्ण…

कोल्हापूर(प्रतिनिधी) – दिवंगत रमेश देव कोल्हापुरात राहिले, इथल्या पंचगंगेत त्यांनी आयुष्यभर उड्या मारल्या. कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिले तेच प्रेम आमच्यावरही राहू दे अशा भावना रमेश देव यांचे चिरंजीव अभिनेता अजिंक्य देव यांनी व्यक्त केल्या. रमेश देव यांच्या अस्थींचे विसर्जन करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे पंचगंगा संगमावर पंचगंगगा नदीत केल्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते.

मराठी व हिंदीचित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या 93 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. रमेश देव यांच्या पूर्वजांची नाळ जोधपूर राजस्थानशी जुळलेली होती. रमेश देव यांचे वडील राजश्री शाहू महाराज यांच्या दरबारात फौजदारी वकील होते. विशेष म्हणजे, रमेश देव यांच्या आजोबा व पणजोबांनी जोधपूर पॅलेसपासून कोल्हापूर शहर वसवण्यात योगदान दिलं होतं.

रमेश देव यांनी कोल्हापुरात बालपण घालविले. रमेश देव हे पंचगंगा नदीत उड्या मारल्या, याच मातीत खेळले. त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी रमेश देव यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी देव कुटुंबीय कोल्हापुरात आले होते.

प्रयाग चिखली येथील पंचगंगा नदीच्या संगमाजवळ त्यांनी देव यांच्या अस्थींचे विसर्जन केले. यावेळी करवीर वासियांनी जे प्रेम रमेश देव यांना दिले तेच प्रेम आमच्या वरही असू दे. आज अस्थी विसर्जन करताना भावना दाटून येत आहेत, अशी भावना अभिनेता अजिंक्य देव यांनी व्यक्त केल्या.

आणखी संबंधित बातम्या

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

2026-10-03 07:49:09

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

2026-10-01 12:17:26

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

2026-09-26 11:55:11

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

2026-09-25 15:10:44

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार

2026-09-21 22:32:20

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार