कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी रमेश बागवेंना विजयी करा; बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे यांचे आवाहन

पुणे – भाजप सरकारच्या काळात कॅन्टोन्मेंटचा विकास ठप्प झाला आहे. कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे. कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी जनतेने रमेश बागवे यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केले. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या १५ ऑगस्ट चौकातील मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन थोरात आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उमेदवार रमेश बागवे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, जैनब बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे , अजित दरेकर , अण्णा थोरात, आरिफ बागवान, संगीता तिवारी, विनोद मथुरावाला, संगीता पवार, मिलिंद अहिरे, जयंत किराड , भगवानराव वैराट, भीमराव पाटोळे, प्रसाद केदारी, रफीक शेख, करण मखवानी, जयकुमार राघवाचारी, राजाभाऊ चव्हाण, पोपट गायकवाड, रमेश अय्यर, विकास कांबळे, रशीद खिजर, मोहसीन नगरवाला, अतुल गोंदकर, प्रतीक कांबळे, सुरेश मखवाना यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन करून विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.
तर महायुतीच्या सरकारमुळे महागाई वाढली आहे. ईडीचा धाक दाखवून सत्तेत आलेले हे सरकार बदलणे काळाची गरज आहे. कॅन्टोन्मेंटचा रखडलेला विकास केवळ महाविकास आघाडी करू शकते. या भागाच्या विकासासाठी जनतेने रमेशदादांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहन सुळे यांनी केले.
“कॅन्टोन्मेंटला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे असतील तर महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”- रमेश बागवे ( काॅग्रेस, महाविकास आघाडी उमेदवार)





