रामदास आठवलेंचा दावा,’लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा कुठलाही हात नाही’

मुंबई – जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज प्रकरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. माध्यमांशी बोलतांना रामदास आठवले म्हणाले, जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी असून यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नसल्याचे वक्तव्य आठवले यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत रामदास आठवले पुढे म्हणाले,’देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले होते, आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही त्यांची असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नाही. लाठीचार्ज करण्याचा पोलिसांचा निर्णय हा त्यांनी परस्पर घेतला असून यासाठी सरकारकडून कोणतेही आदेश दिले नाहीत, असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभरात दिसत आहे. अशात छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बसची जाळपोळही करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी ट्विट करत याबाबत सांगितले आहे.





