Ramdas Athawale । राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. आता सर्व पक्ष तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणूकीसाठी सर्व पक्षाकडून मोर्चेबांधनीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीकडून यात्रा काढत प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेतली जात आहे तर महायुतीकडून राज्यातील मतदारांना खुश करण्यासाठी योजनांची घोषणा करण्यात येत आहे. अशात आज राज्यात दही हंडी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे. मुंबईतील घाटकोपर येथील राम कदम यांनी आयोजित केलेल्या दही हंडीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम्हाला 180 पेक्षा जास्त जागा भेटतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. रामदास आठवले म्हणाले,’ महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार आहे. लोकसभेला जे घडलं ते या वेळेला घडणार नाही, यावेळेला जनता आमच्या पाठीशी उभी राहील, आम्हाला 180 पेक्षा जास्त जागा भेटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा आहे. आम्ही महायुतीत सातत्याने मागणी करत असतो. परंतु, केवळ मागण्या किती दिवस करायच्या, हेही आपल्याला ठरवावे लागेल. असेही ते म्हणाले आहे.