Mandakini : ‘राम तेरी गंगा मैली’मुळे रातोरात स्टार! यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने अचानक घेतली बॅालिवूडमधून एक्सिट
Mandakini : अभिनेत्रीच्या सौंदर्याने अनेकांवर मोहिनी घातली होती. 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटामुळे मंदाकिनी रातोरात स्टार झाली.

Mandakini : बॉलिवूडमधील ८० च्या दशकातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मंदाकिनीने आपल्या पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ३० जुलै १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे जन्मलेल्या मंदाकिनीचे मूळ नाव यास्मिन जोसेफ होते. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना ‘मंदाकिनी’ हे नाव त्यांना मिळाले. अभिनेत्रीच्या सौंदर्याने अनेकांवर मोहिनी घातली होती. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे मंदाकिनी रातोरात स्टार झाली.
राज कपूरांच्या नजरेत भरली आणि बदलले नशीब
मंदाकिनीच्या चित्रपट प्रवासाची सुरुवातही तितकीच रोचक होती. सुरुवातीला ती ‘माधुरी’ या नावाने ओळखली जात होती आणि तिने ‘मजलूम’ हा चित्रपट साइन केला होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिची भेट दिग्गज दिग्दर्शक राज कपूर यांच्याशी झाली. त्यांनी तिला ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटासाठी निवडले आणि याच चित्रपटाने तिचे आयुष्य बदलून टाकले. राजीव कपूरसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना भावली, तर चित्रपटातील काही धाडसी दृश्यांमुळे ती देशभरात चर्चेचा विषय ठरली.

Mandakini
हिट गाणी आणि लोकप्रिय जोडी
‘राम तेरी गंगा मैली’च्या घवघवीत यशानंतर मंदाकिनीने अनेक चित्रपटांत काम केले. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जीते हैं शान से’मधील ‘जुली जुली जॉनी का दिल तुमपे आया जुली’ हे गाणे आजही चाहत्यांच्या आठवणीत ताजे आहे. या गाण्यात मिथुन चक्रवर्तीसोबतची तिची केमिस्ट्री विशेष गाजली होती. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाही तिला चित्रपटसृष्टीतील स्पर्धा आणि आव्हानांचा सामना करावा लागला. राम तेरी गंगा मैली या चित्रपटाएवढी तिच्या दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाची म्हणावी तशी चर्चा झाली नाही. एका मुलाखतीत तिने कमी मानधन स्वीकारणाऱ्या अभिनेत्रीमुळे एक महत्त्वाचा चित्रपट गमावल्याचा खुलासही केला होता.
चित्रपटसृष्टीपासून दूर, कुटुंबाला दिले प्राधान्य
मंदाकिनीचे नाव एकेकाळी अभिनेता कुमार गौरवसोबत ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटाशी जोडले गेले होते. मात्र, या चित्रपटावर प्रत्यक्षात काम झाले नाही. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झोरदार’नंतर तिने हळूहळू चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. माजी बौद्ध भिक्षू डॉ. काग्युर टी. रिनपोचे ठाकूर यांच्याशी विवाह करून तिने कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य दिले.
View this post on Instagram
आजही कायम आहे चाहत्यांच्या मनातील स्थान
चित्रपटसृष्टीपासून दूर राहूनही मंदाकिनीची लोकप्रियता कमी झालेली नाही. ‘राम तेरी गंगा मैली’मधील तिचा अभिनय, तिचे सौंदर्य आणि तिची वेगळी ओळख यामुळे आजही तिचे नाव बॉलिवूडच्या अविस्मरणीय अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिच्या कारकिर्दीचा प्रवास हा यश, संघर्ष आणि लोकप्रियतेची अनोखी कहाणी म्हणून आजही चाहत्यांना प्रेरणा देतो.
Bhushan Pradhan: ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटगृहातून बेपत्ता; भूषण प्रधानने व्यक्त केली खंत



