Rohit Pawar on Ram Shinde : कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने १७ पैकी १५ जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. असं असतानाही केवळ आपल्या ताब्यात नगरपंचायत यावी यासाठी सभापती राम शिंदे यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.
नगरपंचायतमधील नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो मंजूर करण्यासाठी राज्यातील कायद्यामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी बदल केला, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आमदार रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सध्या राज्यात जे सरकार आहे. ते जनतेचे विकासाचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकीय कुरघोड्या करण्यावर भर देत आहे. Rohit Pawar on Ram Shinde |
कर्जत नगर पंचायतीमधील सत्ता टिकविण्यासाठी कायद्यात बदल केला. नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने १७ पैकी १५ जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. असे असतानाही केवळ आपल्या ताब्यात नगरपंचायत यावी यासाठी सभापती शिंदे यांनी सत्तेचा गैरवापर केला असा आरोप त्यांनी केला.
नगराध्यक्षा उषा राऊत या माळी समाजाच्या आहेत म्हणून तसेच त्यांनी आणि त्यांचे सासरे माजी नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी विधानसभेच्या निवडणुकीत माझे अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले. त्याचा राग डोक्यात ठेवून त्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला, असा आरोपहि आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे यांच्यावर केला आहे. त्यांनी सभापती पदाचा देखील गैरवापर केल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. Ram Shinde |
मी कॉपी करणार माणूस नाही.
अजित दादाच्या स्वागताला अनेक कार्यकर्ते पत्र घेऊन गेले आहेत. अनेक कामे अपूर्ण आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीसाठी निधी हवा आहे. माझे लोक तहानलेले आहेत. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा आहे. मी कॉपी करणार माणूस नाही, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.
बॅनर बाबत दिली माहिती
बॅनर रोहित पवार मित्र परिवार याने लावले आहेत. त्या मित्र परिवाराला मी शोधत आहे. सामाजिक काम आहे. त्याच्या सोयीनुसार काम घेतलं आहे. दादा मतदारसंघात आले त्याचा आनंद आहे. दादांचा चार पाच दिवसात कार्यकम ठरला आहे. माझ्या आज वेगळ्या बैठका ठरल्या होत्या. त्यामुळं मी कर्जतला गेलो नाही, असे रोहित पवार म्हणाले. Rohit Pawar |