Ram Mandir Ayodhya Donation। अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 500 वर्षानंतर भगवान श्री राम त्यांच्या भव्य आणि दिव्य राम मंदिरात विराजमान झाले होते.
मोठ्या लढ्यानंतर रामाचे मंदिर अयोध्येत स्थापन झाल्यानंतर अनेकांना आनंद अश्रु अनावर झाला. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन आता महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. । Ram Mandir Ayodhya Donation
23 जानेवारीपासून सुमारे 60 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. आगामी काळात हा आकडा आणखी वाढणार आहे. यामुळे राम मंदिराच्या दानभेटीत धनवर्षा सुरु आहे. भक्तांद्वारे मनोभावे दान करण्याच्या रुपयांमध्ये देखील वाढ होण्याचा अंदाज मंदिर समितीकडून वर्तवला जात आहे.
ऑनलाईन पद्धतीने मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर दान येत आहेत. रामभक्त आपल्या श्रद्धेनुसार दागदागिने, भेटवस्तू, धनादेश, रोकड रक्कम पाठवत आहेत. परंतु काही देणग्या आगळीवेगळ्या ठरत आहेत. । Ram Mandir Ayodhya
नुकतंच एका मुस्लिम भाविकाने एक पत्र आणि धनादेश पाठवले आहे. कारागृहात झाडू लावून मिळालेली दीड महिन्याची कमाई या व्यक्तीने राम मंदिरासाठी दिली आहे. फतेहपूर कारागृहातील कैदी ‘जियाउल हसन’ याने राम मंदिरासाठी धनादेश पाठवला आहे.
जियाउल हसन याने केलेल्या विनंतीनंतर कारागृह प्रशासनाने त्याच्या कमाईचा धनादेश राम मंदिर ट्रस्टकडे पाठवला आहे. त्यासोबत हसन याचे पत्रसुद्धा आहे. 1075 रुपयांचा हा धनादेश आहे.
घनादेश प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी 17 जानेवारी रोजी लिहिला गेला आहे. आता तो राम मंदिर ट्रस्टने खात्यात जमा केला आहे. राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना हा धनादेश आणि पत्र पाहून सुखद आश्चर्य वाटले.
तसेच भाविकाचे कौतूक वाटले. राम मंदिरासाठी भाविक मोठ्या संख्येने दान करत असल्याचं दिसून येत आहे. आणि याची संख्या देखील दिवसागणित वाढत आहे. । Ram Mandir Ayodhya Donation