Ram Gopal Varma : चेक बाऊन्स प्रकरण भोवलं, राम गोपाल वर्मा तुरुंगात जाणार? ७ वर्ष जुन्या केसप्रकरणी न्यायालयाचा आदेश

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एका जुन्या खटल्या संदर्भात रामूच्या अडचणी वाढणार आहेत. सात वर्षे जुन्या खटल्याबाबत न्यायालयाने राम गोपाल वर्मा याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट त्यासोबतच तीन महिन्यांच्या तुरुंगवासाचाही आदेश जारी केला आहे.
राम गोपाल वर्मा त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा विधानांवर अनेकदा वादात सापडले आहेत. मात्र यावेळी ते कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुंबईतील न्यायालयाने 7 वर्ष जुन्या चेक बाऊन्स प्रकरणावर सुनावणी करताना राम गोपाल वर्माला 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावला आहे.
याचिकेच्या सुनावणी दरम्यान रामू न्यायालयात हजर नव्हते, ही बाब लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशात राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांत तक्रारदाराला 3 लाख 72 हजार 219 रुपयांची भरपाई द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. राम गोपाल वर्मा यांनी ही रक्कम दिली नाही तर त्यांना तीन महिन्यांसाठी तुरुंगात पाठवले जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
रामचा पुढचा प्रोजेक्ट सिंडिकेट
ज्या गुन्ह्यात राम गोपालला शिक्षा सुनावण्यात आली आहे, तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम 131 अंतर्गत येतो, ज्या अंतर्गत चित्रपट निर्मात्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या वादात राम गोपाल वर्मा यांचे नाव त्यांच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेबाबतही चर्चेत राहिले. रामूच्या पुढील चित्रपटाचे नाव सिंडिकेट आहे, ज्याची घोषणा रामूने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. या पोस्टमध्ये रामूने २०२२ मध्ये एकदा चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मिळाल्याचे सांगितले आहे.
“ONLY MAN CAN BE THE MOST TERRIFYING ANIMAL “
In CONTINUATION to my CONFESSION note on SATYA film , I DECIDED to make the BIGGEST film ever
The film is called SYNDICATE
It’s about a terrifying organisation which threatens the very EXISTENCE of INDIA
The CONCEPT
STREET…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 22, 2025





