अक्षयच्या भूत बंगला सिनेमात राम चरणचा कॅमिओ? दिग्दर्शकाने दिली महत्वाची अपडेट; म्हणाला…

Bhoot Bangala Movie | अक्षय कुमार आणि प्रियदर्शन बऱ्याच वर्षांनंतर एका सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत. भूत बांगल या नव्या सिनेमातून अक्षय आणि प्रियदर्शन या दिग्दर्शक अभिनेत्याची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा जॅानर हॉरर-कॉमेडी असून, सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. नुकतेच या सिनेमाच्या जयपूर येथील शूटिंग शेड्यूल संपले आहे. या ठिकाणी सिनेमाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग शूट करण्यात आला आहे. आता सिनेमाच्या सेटवरुन एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत साऊथचा अभिनेता राम चरण दिसत आहे.
हा फोटो अक्षय कुमारच्या अनेक फॅन पेजने शेअर केला आहे. ज्यामध्ये राम चरण दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत बोलताना दिसत आहे. या फोटोत प्रियदर्शन एका सीनबद्दल राम चरणला सांगत असल्याचे दिसत आहे. मात्र, अशीही शक्यता आहे की, राम चरण फक्त प्रियदर्शनला भेटण्यासाठी सेटवर पोहोचला होता. मात्र, ‘भूत बंगला’मध्ये राम चरणच्या कास्टिंगबाबत निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. पण जर राम चरण या सिनेमात दिसला, तर अक्षयसोबत त्याची जोडी अप्रतिम असेल असे सांगितले जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये, असा दावा केला जात आहे की राम चरण या सिनेमात कॅमिओ करू शकतो.
अक्षय कुमारने विष्णू मंचूच्या कन्नप्पा या सिनेमात कॅमिओ केला आहे. आता ‘भूत बंगला’मध्ये राम चरण देखील महत्त्वाचा कॅमिओ असणार असल्याचे सांगितले जाते. या सिनेमाच्या कथेबद्दल बॉलिवूड हंगामाने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये प्रियदर्शनने चित्रपटाच्या कथेबद्दल सांगितले.
‘मी तुम्हाला संपूर्ण कथा सांगू शकत नाही, परंतु मी तुम्हाला हे नक्कीच सांगेन की हॉरर कॉमेडी क्षेत्रातील हा एक नवीन टप्पा असेल. ‘भूत बंगला’ पौराणिक कथा आणि काळ्या जादूवर आधारित सिनेमा असणार आहे. काळी जादू हा सिनेमाचा प्रमुख विषय असल्याचे प्रियदर्शन यांनी सांगितले आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, वामिका गब्बी आणि जिशू सेनगुप्ता हे कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा 02 एप्रिल 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.




