राम चरणच्या ‘गेम चेंजर’ला पायरसीचा फटका, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक

Game Changer Movie Online Leak: अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री कियारा आडवाणीची मुख्य भूमिका असलेला ‘गेम चेंजर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. मात्र, रिलीजच्या काही तासाच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला. पहिल्या शो नंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. मात्र, रिलीजनंतर लगेचच चित्रपटला पायरसीचा फटका बसला.
राम चरण 4 वर्षांनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, रिलीज झाल्यानंतर काही तासातच चित्रपटाची फुल एचडी कॉपी ऑनलाइन लीक झाली आहे.
पायरेटेड कॉपी तमिलरॉकरज, फिल्मीजिला, मूव्हीरूलेज, टेलिग्रॅम आणि इतर टोरंट वेबसाइटवर उपलब्ध झाली आहे. गेम चेंजरचे बजेट हे 450 कोटी रुपये आहे. चित्रपटाच्या गाण्यांच्या निर्मितीसाठीच तब्बल 75 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळेच पहिल्याच दिवशी चित्रपट अशाप्रकारे ऑनलाइन लीक झाल्याने याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळू शकतो. भारतात पायरसी करणे गुन्हा असून, असे करणाऱ्याला शिक्षा देखील होऊ शकते.
दरम्यान, रिलीजनंतर सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. या चित्रपटाची दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे. तर थमन एस यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. राम चरण या चित्रपटाच्या माध्यमातून 4 वर्षांनी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. याआधी त्यांनी ‘आरआरआर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.





