पुणे जिल्हा | महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी सासवडमध्ये रॅली

सासवड, (प्रतिनिधी) – सासवड (ता पुरंदर) येथे गुरुकुल अकॅडमीच्या वतीने महीलाच्या वरील आत्यार थांबावेत यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली ही चांदणी चौक येथून जनजागृती रॅलीची सुरुवात झाली व शिवतीर्थ चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला
गणपती बाप्पाचे आगमनाचा दिवसानिमित्ताने गणपती खरेदी करण्यासाठी शनिवारी (दि. 7) सकाळपासून सासवड शहरात गर्दी होती संपुर्ण सासवड शहर भक्तीमय वातावरणात रमले होते.
वरुणराजाच्या हजेरीने वातावरण प्रसन्न झाले होते. दरन्याम सासवड येथील गुरुकुल अकॅडमीच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया घोषणांनी वातावरणात दुमदुमून गेले होते.
शिवतिर्थ येथे रॅली आल्यानंतर पुणे जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुरुकुल अकॅडमीचे प्राचार्य संदीप टिळेकर, प्राध्यापिका उषा टिळेकर, पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे, ऐश्वर्या भुजबळ, ऋतुजा चौधरी, साक्षी खैरे, दत्तात्रय रोकडे, आदी उपस्थित होते.





