रकुल प्रीत सिंगला बॉलीवुडमध्ये 10 वर्ष पूर्ण; म्हणाली ‘इथंपर्यंत पोहचण्यासाठी…’

Rakul preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने 2014 मध्ये ‘यारिया’ या चित्रपटाद्वारे सिनेक्षेत्रात पदार्पण केले. दिव्या खोसला कुमार दिग्दर्शित यारियां चित्रपटात तिने सलोनीची भूमिका साकारली होती. यातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नुकतेच या चित्रपटाला आणि रकुल प्रीत सिंगच्या सिनेसृष्टीला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
‘यारिया’ चित्रपटाच्या रिलीजला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, रकुलने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे काही फोटो शेअर केले आहेत. पोस्ट करत तिने लिहिले की, ’10 वर्षांपूर्वी, जेव्हा मी पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते, तेव्हा मी फक्त मोठी स्वप्ने बाळगलेली एक तरुण मुलगी होते. आज मी जिथे आहे. तिथे पोहचण्यासाठी मेहनत, चिकाटी, सातत्य लागले.’
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, ‘अजून बरेच काही साध्य करायचे आहे. पण, मी केलेल्या कामाबद्दल मनात खूप कृतज्ञता आहे.कारण ते माझ्या तरुण मुलीसाठी ते अजूनही स्वप्नवत आहे. तुम्ही सर्वांनी मला माझी स्वप्ने साकार करण्यात मदत केली’. दरम्यान, रकुल प्रीत सिंगने ‘गिल्ली’ या कन्नड सिनेमाच्या माध्यमातून तिने 2009 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केल होते. त्यानंतर ‘यारिया’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने 2014 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. हिंदीसह तामिळ आणि तेलुगू सिनेमांत देखील तिने काम केले आहे.
रकुल प्रीत सिंग जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. रकुल प्रीत सिंहने 2021 मध्ये जॅकी भगनानीसोबतचं प्रेम जगजाहीर केलं. त्यानंतर आता रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार असून गोव्यात त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप या जोडप्याने अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही. रकुल प्रीत सिंहचा बॉयफ्रेंड जॅकी हा निर्माता आहे.





