जेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मुंबई: भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाचे वातावरण असून अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परंतु,”जेटलींच्या निधनाबद्दल मला दहा दिवस अगोदरच कल्पना अली होती.” असे सांगत  ड्रामा क्विन राखी सावंत ने एक वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वादग्रस्त व्हिडीओ मध्ये तिने अजबच दावा केला आहे. ती म्हणते, ”जेटलीजी भाजपाचे नेते आहेत. ते आज आपल्यात नाहीत. मी एक आठवड्यापूर्वी नव्हे दहा दिवसांपूर्वीच हे म्हटले होते. मला कधी कधी स्वप्न येतात आणि मला भविष्यात घडणा-या अनेक गोष्टी आधीच माहित होतात. कसे माहित नाही, पण ही दैवी शक्ती आहे. मला ही दैवी शक्ती दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार. जेटलींच्या आत्म्याला शांती मिळो, इतकेच मी म्हणेल. जेटलींच्या ‘पोटली’तून चांगले चांगले बजेट निघाले. देश त्यांना स्मरणात ठेवेल.’’

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)