Rajya Sabha Majority: देशातील १० राज्यांमध्ये पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झालेत. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय प्राप्त झाला आहे. एनडीएने ३७ जागांपैकी २२ जागांवर विजय मिळवत वरच्या सभागृहातील आपली ताकद पुन्हा एकदा वाढवली आहे. मात्र, या मोठ्या यशानंतरही भाजपला स्वतःच्या बळावर बहुमत मिळवण्यासाठी अजूनही धडपड करावी लागणार आहे. भाजपला आता बहुमतासाठी १६ जागांची गरज Rajya Sabha Majority: नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीपूर्वी राज्यसभेत भाजपचे १०३ सदस्य होते. त्यापैकी ९ सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने संख्या ९४ वर आली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपने १३ जागा जिंकून आपली एकूण संख्या १०३ वर नेली आहे. यामुळे भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली असली तरी, २४५ सदस्यांच्या राज्यसभेत बहुमतासाठी लागणाऱ्या १२३ आकड्यापासून भाजप अजूनही १६ जागांनी दूर आहे. त्याची जोड घालणे आता भाजपला गरजेचे आहे. Rajya Sabha Majority: राज्यसभेत एनडीएला स्पष्ट बहुमत या निवडणुकीनंतर एनडीएची एकूण ताकद १४१ सदस्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एनडीएला राज्यसभेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एनडीएमध्ये भाजपसोबतच एआयएडीएमके (५ ), जेडीयू (४ ), एनसीपी (४ ), टीडीपी (२ ), शिवसेना (२ ) यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. तसेच ६ मनोनीत सदस्यांचा पाठिंबाही एनडीएला मिळाला आहे. निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का Rajya Sabha Majority: या निवडणुकीत विरोधकांना मात्र मोठा धक्का बसला आहे. ‘इंडिया’ आघाडीची एकूण संख्या ७४ वर आली आहे. विरोधकांमध्ये काँग्रेसकडे २८ , टीएमसीकडे १३ आणि डीएमकेकडे ८ जागा आहेत. इतर पक्षांची ताकद मर्यादित राहिली आहे. निवडणुकीपूर्वीच्या तुलनेत विरोधकांची स्थिती कमकुवत झाली आहे. ३७ पैकी २६ सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ११ जागांसाठी मतदान झाले. हरियाणा, बिहार आणि ओडिशा या राज्यांतील ११ जागांपैकी एनडीएने ९ जागांवर विजय मिळवला, तर विरोधकांना केवळ २ जागा मिळाल्या. भाजपला राज्यसभेत स्वतःच्या बळावर बहुमत मिळवण्यासाठी किमान १६ जागांची गरज आहे. ही भरपाई करण्यासाठी पक्षाला २०२६ मधील आगामी निवडणुका तसेच २०२८ पर्यंत वाट पाहावी लागू शकते.