Rajya Sabha Election candidates : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचे नाव ‘फिक्स’? भाजपचीही तयारी अंतिम टप्प्यात
Rajya Sabha Election candidates : येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार

Rajya Sabha Election candidates : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी रात्री कोअर कमिटीची बैठक पार पडली. ज्यात आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. तसेच 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी यावेळी चर्चा झाल्याचे समजते. येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केला जाईल. Parth Pawar
भाजप-शिवसेनेकडून कोणाच्या नावाची चर्चा
भाजपकडून राज्यसभेचे आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाणार आहेत. यापैकी एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित आहे. तर उर्वरीत तीन जागांसाठी कुणाचं नाव समोर येतं याविषयी चर्चा रंगली आहे. यासाठी विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.
तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित मानल्या जात आहे. तसेच शिंदे गटाकडून शायना एनसी आणि संजय निरुपम यांच्या नावाचीही चर्चा आहे. Parth Pawar
राज्यसभेसाठी निवडणूक कार्यक्रम
- राज्यसभेच्या 37 जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी नोटिफिकेशन
- 5 मार्च उमेदवारांना अर्ज स्वीकार
- 6 मार्च रोजी अर्ज छाननी
- 9 मार्च रोजीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
- 16 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान
- 16 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून मत मोजणीला सुरुवात
- 20 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
हेही वाचा :
Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात…





