Rajya Sabha Election 2024 । महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
BJP releases another list of candidates for the Rajya Sabha Biennial elections.
Union Minister L Murugan from Madhya Pradesh
Union Minister Ashwini Vaishnaw from Odisha pic.twitter.com/gE7m8geLCu— ANI (@ANI) February 14, 2024
अशात आता भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 5 उमेदवारांची नावे आहे. भाजपने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना ओडिशातून उमेदवारी दिली आहे. तर माया नरोलिया आणि एल मुरुगन यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले आहे.
हेही वाचा