राज्यसभेत गोंधळ घालणं पडलं महागात; ‘त्या’ 12 खासदारांवरील हक्कभंग चौकशीला राज्यसभेच्या अध्यक्षांची अनुमती

नवी दिल्ली – राज्यसभेतील वर्तनाबद्दल विरोधी पक्षाच्या बारा खासदारांवरील हक्कभंग कारवाईच्या चौकशीला राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांनी अनुमती दिली आहे. राज्यसभेतील कॉंग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्यावर निलंबानाची कारवाई केल्यानंतर राज्यसभेत या खासदारांनी गोंधळ घालत अशोभनीय वर्तन केले होते.
तसेच अदानी गैरव्यवहार प्रकरणात तहकुबीची सुचना फेटाळूनही तशाच स्वरूपाच्या सुचना वारंवार केल्या होत्या, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे. या खासदारांच्या वर्तनाच्या संबंधातील विषय सभागृहाच्या विशेषाधिकार समितीकडे सुपुर्त केला जाणार आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/20-thousand-crore-rupees-fund-for-pradhan-mantri-matsya-sampada-yojana-union-fisheries-minister-parashottam-rupala/
ही समिती त्याची चौकशी करून आपला अहवाल अध्यक्षांना सादर करणार आहे. हे 12 खासदार आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस पक्षाचे आहेत. त्यात शक्तिसिंह गोहील, सुशिलकुमार गुप्ता, संदीपकुमार पाठक, इम्रान प्रतापगडी, आम आदमी पक्षाचे संजयसिंह आदिंचा समावेश आहे.
अदानी प्रकरणात सभागृहात चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या नोटीसा संजयसिंह यांनी वारंवार दिल्याने त्यांच्याविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.





