‘पाखऱ्या’च्या वाढदिवसाला राजू शेट्टींची हजेरी
Updated On:

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे शंकर पाटील कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या पाखऱ्या बैलाचा दुसरा वाढदिवस अगदी उत्साहात साजरा केला आहे. विशेष म्हणजे या वाढदिवस सोहळ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थिती लावली होती.
पाटील कुटुंबीयांनी पाखऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जवळपास चारशे लोकांचे जेवण घातले होते आणि वाढदिवसाला आलेले मित्रमंडळी यांनी पाखऱ्याचा वाढदिवस अक्षरशः आरती ओवाळून, केक कापून आणि केक भरवून साजरा केला आहे.





