पंतप्रधानाबद्दल राजू शेट्टी म्हणाले ….
Updated On:

अलिबाग : जिल्हा परिषदांच्या निवडणुकात भाजपाला जनतेने नाकारले आहे. त्यावर आता शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी जगभर फिरण्यावर खर्च करण्यापेक्षा हवामान बदल, तंत्रज्ञानावर खर्च केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
ते आज अलिबाग मधील ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने विकासाची स्वप्ने जनतेला दिली मात्र भाजप ती पूर्ण करू शकला नाही. भाजप समाजात तेढ निर्माण करीत आहे. जनतेने यासाठी भाजपला निवडून दिले का? देश भ्रष्टचार मुक्त झाला का? भाजपने जनतेची फसवणूक केली असून जनता त्यांना त्यांची जागा दाखून देईल, असे ते म्हणाले.





