Rajnath Singh : राहुल गांधी स्वतःला पंतप्रधानपदाचे दावेदार मानतात; राजनाथ सिंह यांची टीका
राहुल गांधी स्वतःला पंतप्रधानपदाचा दावेदार मानतात आणि त्या पदावर इतर कोणालाही स्वीकारण्यास ते तयार नसतात, अशी टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केली.

Rajnath Singh : राजकारणात एखाद्या पदाची आकांक्षा ठेवण्यात काहीही गैर नाही, परंतु देशाच्या सर्वोच्च पदाला आपला जन्मसिद्ध अधिकार मानणे चुकीचे आहे. राहुल गांधी स्वतःला पंतप्रधानपदाचा दावेदार मानतात आणि त्या पदावर इतर कोणालाही स्वीकारण्यास ते तयार नसतात, अशी टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केली.
जम्मूमध्ये आयोजित केलेल्या लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ पदयात्रा आणि रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिह (Rajnath Singh) यांनी ही टीका केली. राजनाथ सिंह म्हणाले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर राहुल गांधींनी आपल्या मित्रांना सांगितले होते की, २०२४ मध्ये माझी वेळ येईल, ज्याचा अर्थ असा की, त्यांना त्या वर्षी पंतप्रधान होण्याची अपेक्षा होती. पण २०२४ साल येऊन गेले आणि नरेंद्र मोदी अजूनही देशाचे पंतप्रधान आहेत.
२०२४ मध्येही देशातील मतदारांनी राहुल गांधींच्या महत्त्वाकांक्षांना धक्का दिल्यानंतर, त्यांनी जर हे पद मला मिळत नसेल, तर ते कोणालाही मिळू नये, अशी वृत्ती स्वीकारली आहे. त्यांनी राहुल गांधी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करून लोकशाहीसमोर संकट निर्माण करत आहे. मात्र, देशातील जनता राजकीयदृष्ट्या जागरूक असून अशा प्रकारच्या मनसुब्यांना यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे आव्हान दिले होते. यावर राजनाथ सिंह यांनी सांगितले की, संसद हे देशातील सर्वोच्च लोकशाही व्यासपीठ आहे आणि राहुल गांधींनी आधी संसदीय चर्चांमध्ये सहभागी होण्याची इच्छा दाखवावी, असा टोला (Rajnath Singh) लगाविला.






