Rajnath Singh on POK । जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला धारेवर धरले आहे. त्यांनी पाकिस्तनावर निशाणा साधताना, “दहशतवादाच्या व्यवसायात सहभागी असलेल्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने खूप प्रगती केली आहे,” असे त्यांनी म्हटले. आपली संरक्षण रचना पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. तसेच संरक्षणमंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख केला. त्यांनी पीओकेच्या माध्यमातून पाकिस्तानला कडक संदेश दिला. राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत पीओकेचा उल्लेख केला. ते म्हणाले,”पीओकेमधील लोक आपलेच आहेत, त्यांना फक्त दिशाभूल केली जात आहे. पीओके हा आपलाच एक भाग आहे आणि मला विश्वास आहे की एक दिवस पीओके स्वतःच म्हणेल की तो भारताचाच एक भाग आहे.” पीओकेची तुलना महाराणा प्रतापशी Rajnath Singh on POK । राजनाथ सिंह यांनी यावेळी ,”पीओके आपल्यासाठी आहे जसे महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंह त्यांच्यासाठी होते. त्यांनी शक्ती सिंह यांच्याबद्दल म्हटले होते की, ते आता वेगळे झाले असले तरी ते अजूनही आमचे भाऊ आहेत. ते कुठेही जातील तरी ते आमच्याकडे परत येतील. त्याचप्रमाणे, पीओके काही काळापासून आपल्यापासून वेगळे झाले आहे, परंतु ते आपल्या भावाकडे परत येईल. पीओकेमध्ये राहणाऱ्या आमच्या या भावांची परिस्थिती शूर योद्धा महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंह यांच्यासारखीच आहे.” असे म्हटले. आता फक्त दहशतवादावरच चर्चा होणार Rajnath Singh on POK । राजनाथ सिंह यांनी पाकिस्तनाला इशारा देताना “पाकिस्तानला हे समजले आहे की दहशतवादाला प्रोत्साहन देणे हे किफायतशीर नाही. आता जेव्हा जेव्हा चर्चा होईल तेव्हा ती पीओकेवर, दहशतवादावर असेल. आम्ही मोदीजींच्या एक भारत, महान भारताच्या संकल्पाशी वचनबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की ते भाऊ देखील एक दिवस भारताच्या मुख्य प्रवाहात परततील. तिथल्या बहुतेक लोकांना भारताशी जोडलेले वाटेल. मी भारत आहे, मी भारत आहे, मी परत आलो आहे, पीओके हे म्हणेल, मला पूर्ण विश्वास आहे.” असे म्हणत मोठे विधान केले आहे.