राजनाथ सिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rajnath Singh । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यांतर्गत, आज 8 कोटी 95 लाखांहून अधिक मतदार 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या 49 लोकसभा जागांसाठी 94732 मतदानाच हक्क बजावणार आहेत. त्यासोबतच ओडिशा विधानसभेच्या उर्वरित 35 जागांवरही आज मतदान होत आहे.दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनऊमध्ये मतदान केले.
पक्षाच्या विजयाचा विश्वास Rajnath Singh ।
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातहि मतदान होत आहे. त्यासाठीच संरक्षण मंत्री आणि लखनौ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजनाथ सिंह यांनी मतदान केले. सकाळीच त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी पक्षाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. या जागेवरून ते समाजवादी पक्षाचे उमेदवार रविदास मेहरोत्रा यांच्याविरुद्ध लढत आहेत.
#WATCH | Uttar Pradesh: Defence Minister and BJP candidate from Lucknow Lok Sabha seat, Rajnath Singh casts his vote for #LokSabhaElections2024 at a polling booth in Lucknow
Samajwadi Party has fielded Ravidas Mehrotra from this seat. pic.twitter.com/Ls3bIltOfh
— ANI (@ANI) May 20, 2024
49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात Rajnath Singh ।
पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत. आज महाराष्ट्रातील १३, उत्तर प्रदेशातील १४, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, ओडिशातील पाच आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात कमीत कमी (४९) जागांवर मतदान होणार आहे.





