राजकुमार रावने ‘स्त्री 2’ मधील हटवलेल्या सीनची दाखवली झलक

Stree 2 Uncut Scene | अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा ‘स्त्री 2’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र या चित्रपटातील एक सीन फायनल कटमध्ये काढून टाकण्यात आला होता. आता राजकुमार रावने या सीनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ज्यात राजकुमार रावचा लुक पाहून सर्वच जण थक्क झाले आहेत.
राजकुमारने त्याच्या स्त्री लूकमधले दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत लाल आणि गोल्डन रंगाच्या वनपीसमध्ये राजकुमारने मुलीचा लुकमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये तो फारच सुंदर दिसत आहे. यात राजकुमारने दिग्दर्शक अमर कौशिकसोबत खास पोज दिली आहे.
View this post on Instagram
राजकुमारने हा लूक शेअर करुन त्यामागील कहाणी उलगडली आहे. राजकुमार म्हणतो, “माझा सिनेमातला आवडत्या सीनपैकी एक सीन. हा सीन सिनेमाच्या फायनल कटमध्ये ठेवण्यात आला नाही. तुम्हाला हा सीन बघायला आवडेल का? मला सर्वांनी सांगा” असं कॅप्शन दिले आहे.
यासोबतच त्याने ही पोस्ट अमर कौशिक यांनाही टॅग केली आहे. राजकुमार रावने हा फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सध्या त्याचा मुलीच्या वेशातील हा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नेटकऱ्यांसह चाहत्यांनी हा सीन दाखवण्याची मागणी केली आहे. Stree 2 Uncut Scene |
या पोस्टवर श्रद्धा कपूरने लिहिले, ‘होय! विकी प्लीज टाकून घे. तर अभिनेता विजय वर्माने लिहिलं आहे, ‘हाहाहा, मी हे पाहण्यासाठी पैसे देईन.’ हा सीन आता ओटीटीवर दाखवण्याची मागणी केली जात आहे. Stree 2 Uncut Scene |
हेही वाचा:





