राजकुमार राव आणि पत्रलेखा होणार आई-बाबा; शेअर केली खास पोस्ट

Rajkummar Rao and Patralekha | बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या घरात लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्याने स्वत: ही माहिती इनस्टाग्रामवर पोस्ट करत दिली आहे. ज्यानंतर त्यांच्यावर चाहत्यांसह कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राजकुमार रावने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ‘Baby on the way असं लिहिलं आहे. तसंच या पोस्टवर ‘राजकुमार आणि पत्रलेखा’ असं दोघांचं नावही लिहिले आहे. तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये फक्त ‘खूप आनंदी’ असं म्हटलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लरसह अनेक कलाकारांनी राजकुमारच्या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आहेत. Rajkummar Rao and Patralekha |
View this post on Instagram
राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ऑक्टोबर २०२१ मध्ये राजकुमारने पत्रलेखाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी चंदीगडमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. २०१४ मध्ये आलेल्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एकत्र काम केलं आहे.
अलिकडेच ते ‘फुले’ चित्रपटातही एकत्र दिसले होते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता ‘मलिक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या ११ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Rajkummar Rao and Patralekha |
हेही वाचा:
सहा दिवसांनी येमेनमध्ये फाशी ; निमिषाला वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका





