राजकुमार राव आणि पत्रलेखाने दिली आनंदाची बातमी; अखेर ‘त्या’ पोस्टचा सस्पेन्स उघडला

Rajkummar Rao | अभिनेता राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा सोशल मीडियावर सर्वांना एक आनंदाची बातमी जाहीर करणार असं सांगितलं होतं. यानंतर आता दोघांनी याचा खुलासा केला आहे.
राजकुमार-पत्रलेखाने स्वतःचं प्रॉडक्शन हाउस सुरु केलं आहे. कॅम्पा फिल्म्स हे राजकुमार-पत्रलेखाच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. दोघांनी सोशल मीडियावर कॅम्पा फिल्म्सचा खास व्हिडीओ शेअर करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. या प्रॉडक्शन हाउसचा पहिला प्रोजेक्ट लवकरच रिलीज होणार आहे.
सुरुवातीला त्यांच्या पोस्टनंतर राजकुमार – पत्रलेखा आई-बाबा होणार असून त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र तसे काही नसल्याचे त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले होते. प्रॉडक्शन हाऊस सुरु केल्यानंतर दोघेही खूप आनंदी आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
राजकुमार रावच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अलिकडेच तो तृप्ती डीमरीसोबत ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्याआधी तो श्रद्धा कपूरसोबत ‘स्त्री २’मध्येही झळकला होता. तर पत्रलेखा ‘IC 814 कंदहार हायजॅक’ या वेबसीरिजमध्ये दिसली. याशिवाय ती प्रतीक गांधी याच्यासोबत ‘फुले’ या हिंदी सिनेमात ती सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे.





