मोठी बातमी! विदर्भात अजित पवारांची ताकद वाढली; भाजपच्या माजी मंत्र्याचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

गोंदिया – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नाराज नेत्यांचे इनकमिंग, आउटगोईंग सुरु आहे. आज मंगळवारी भाजपच्या बड्या नेत्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आता अजित पवारांना विदर्भात मोठे बळ मिळणार आहे. बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. (Rajkumar Badole joins Ajit Pawar NCP)
राजकुमार बडोले यांचा गोंदिया भागात मोठा प्रभाव –
राजकुमार बडोले यांचा गोंदिया भागात मोठा प्रभाव आहे. त्यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. बडोले हे 2009 ते 2014 पर्यंत भाजपकडून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा मोरगाव अर्जुनी विधानसभेतून आमदार झाले. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. मात्र, 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुढे यांच्याकडून बडोले यांना 718 मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.
आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजपसोबत आल्याने मोरगाव अर्जुनी विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार हे प्रश्नचिन्ह असतानाच राजकुमार बडोले यांनी आज मुंबई येथे अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्याने आता इथली उमेदवारी कोणाकडे जाते हे पाहणे महत्त्वाचे असेल.
पक्षाची ताकद वाढली – अजित पवार
माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या पक्ष प्रवेशानंतर अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम प्रदेश कार्यालयात पार पडला. राजकुमार बडोलेंसारखा एक अनुभवी आणि जनसामान्यांसाठी आवाज उठवणारा नेता पक्षात सामील झाल्याने पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
माजी मंत्री मा.श्री. राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम प्रदेश कार्यालयात पार पडला. राजकुमार बडोलेंसारखा एक अनुभवी आणि जनसामान्यांसाठी आवाज उठवणारा नेता पक्षात सामील झाल्याने पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचं मी… pic.twitter.com/bL6Ld7zF9P
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 22, 2024





