‘बाबा तुमच्या आठवणी…’ ; राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधी भावुक

Rajiv Gandhi Death Anniversary । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. राजीव गांधी यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी राजीव गांधींच्या समाधीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राहुल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी राजीव गांधींसोबतचा एक फोटो आणि त्यांच्या समाधी स्थळाचा दुसरा फोटो शेअर केला आहे. राहुलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बाबा, तुमच्या आठवणी मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात. तुमची अपूर्ण स्वप्ने सत्यात उतरवण्याचा माझा संकल्प आहे – आणि मी ती नक्कीच पूर्ण करेन.”
पापा, आपकी यादें हर कदम पर मेरा मार्गदर्शन करती हैं।
आपके अधूरे सपनों को साकार करना ही मेरा संकल्प है – और मैं इन्हें पूरा करके रहूंगा। pic.twitter.com/jwptCSo1TN
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2025
काँग्रेस अध्यक्षांनी राजीव गांधींना वाहिली श्रद्धांजली
राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते राहुल गांधींसोबत राजीव गांधींच्या स्मृती वीरभूमीवर पोहोचले. त्यांच्यासोबत पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचेही स्मरण केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे श्रद्धांजली वाहिली.
राजीव गांधी वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी पंतप्रधान Rajiv Gandhi Death Anniversary ।
राजीव गांधी वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले. ते ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. राजीव पूर्वी पायलट म्हणून काम करत होते, परंतु १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ते पंतप्रधान झाले. त्यांना संगणक क्रांतीचे जनक म्हटले जाते.





