रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह? अभिनेत्याला जोक पडला महागात

मुंबई – दाक्षिणात्य सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांचा देशातच नव्हे तर परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या ऍक्शन आणि हटके अंदाजामुळे ते सर्वांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत. काही लोक तर रजनीकांत यांना देव मानतात. त्यामुळे रजनीकांत यांना ट्रोल केल्यानंतर अनेकदा त्यांचे चाहते त्यांच्या समर्थनार्थ उभे राहतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

नुकतंच बॉलिवूड अभिनेता ‘रोहित रॉय’ने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टनंतर रोहितला रजनीकांत यांच्या चाहत्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे. रोहितने आपल्या पोस्ट मध्ये लिहलं कि, “रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह असून आता कोरोना क्वारंटाईनमध्ये आहेत”. अशी पोस्ट केली होती.

दरम्यान, ट्रोलर्सला उत्तर देत रोहितने सर्वांना शांत व्हायला सांगितले. हा केवळ मजेशीररित्या केलेला एक विनोद आहे. मात्र रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून हा विनोद असंवेदनशील असल्याची भावना व्यक्त होत असून रोहित रॉयला ट्रोल करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.