Bribe Crime: खेडमधील तलाठ्यास 4000रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

राजगुरूनगर – जमिनीच्या सातबारावर नोंद घालण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. खेड तालुक्यातील टोकावडे सजाचे सुजित सुधाकर अमोलिक, (वय 50) असे कारवाई केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
या प्रकरणात वाळद येथील तक्रारदार यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची सातबारा सदरी नोंद करयाकरीता लोकसेवक तलाठी अमोलिक यांनी 5 हजार रूपये लाचेची यात त्यात तडजोड झाली होती. दरम्यान, मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे दिली होती. तक्रारीनुसार ती राजगुरुनगर येथे असलेल्या कार्यालयात स्वीकारण्यात येणार होती.
मंगळवारी (दि. 7) दुपरी 12 वाजण्याच्या सुमारास लाच स्वीकारल्यावर लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी राजगुरूनगर येथील तलाठी कार्यालयात अटक केली. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7अन्वये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करत आहेत.





