राजगुरूनगर – ८० वर्षे वय असलेल्या वडिलांनी लग्नासाठी विवाह नांवनोंदणी केल्याचा रागातून मुलाने वडिलांचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना राजगुरूनगर शहरात घडली आहे. शंकर रामभाऊ बो-हाडे ( वय ८० ) रा, वैशांयपन आळी, राजगुरूनगर ता. खेड, असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून शेखर शंकर बो-हाडे (वय ४७ ) याने त्यांचा खून केला आहे. याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजगुरूनगर येथील ८0 वर्षीय शंकर बोऱ्हाडे यांनी स्व:ताच्या लग्नासाठी वधु – वर सुचक मंडळात विवाह नांव नोंदणी केली होती. त्यामुळे चिडून जाऊन मुलाकडून वयोवृध्द वडीलांचा दगडाने ठेचुन खुन केला. खुन केल्याची कबुली व फिर्याद स्वःता आरोपीने पोलिस ठाण्यात येऊन दिली.त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार शंकर रामभाऊ बो-हाडे यांनी परस्पर वधु – वर सुचक मंडळात पैसे भरून स्वत:च्या लग्नाची नोंदणी केली होती. याबाबत आरोपी मुलगा शेखर बो-हाडे यांच्याशी वडील शंकर बोऱ्हाडे खोटे बोलले. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने शेखर बोऱ्हाडे यांने किचन रूममधील कांदा कापण्याची सुरी घेवुन वडीलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला परंतु सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. घरात असलेल्या दगडी वरवंटयाने वडील शंकर बोऱ्हाडे यांच्या तोंडावर व डोक्यात जोराचे प्रहार करून खुन केला. या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिशकुमार गुरव करीत आहे.