कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईतांना अटक
Updated On:

राजगुरूनगर – कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी दिली. त्यांच्याकडून मोबाइल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी, लोखंडी कोयता असा एकूण 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या दोघांना खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संतोष एकनाथ घोंगटे (वय 19), चंद्रकांत अशोक कुऱ्हाडे (वय 19) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.





