ठाण्यात आज “राजगर्जना”, सभेला काही तास शिल्लक असताना संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट

मुंबई – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्याविरोधात शिवतीर्थावरुन एल्गार तर केला. मात्र त्याच एल्गाराचे साईड इफेक्ट पक्षात उमटू लागले आहेत. यातच राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा होणार आहे. या सभेत गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या भाषणाचे पडसाद उमटले, यावर आज उत्तरसभा होणार आहे. राज ठाकरेंच्या आज पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान ही उत्तरसभा सुरु होण्यापूर्वी आज सकाळीच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून ‘लाव रे तो व्हिडिओ’ पुन्हा गाजणार असल्याचं म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांनी केलेले ट्विट सध्या सोशलवर मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.
तत्पूर्वी, राज ठाकरे मुंबईतील आपल्या सभेनंतर राजकीय पातळीवर पुन्हा एकदा महत्वाचे स्थान घेण्याची संधी मिळत असताना विरोधकांकडून केली जाणारी टीका खरी होऊ नये याची काळजी घेताना दिसत आहेत. त्यामुळेच आज ठाण्यात नेमकं काय बोलणार याचा टिझर देखील मनसेच्या वतीने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला होता.
काय आहे संदीप देशपांडे यांचे ट्विट
राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना “लावरे तो व्हिडीओ”ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची #उत्तरसभा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 12, 2022





