राजस्थान रॉयल्सच्या जैस्वाल, बटलर, जुरेल, पडिकल यांची विस्फोटक फलंदाजी; CSKला दिले 203 धावांचं आव्हान

IPL 2023 चा ३७वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने सामने आले आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
राजस्थान ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानला पहिला धक्का नवव्या षटकात ८६ धावांवर बसला. रवींद्र जडेजाने जोस बटलरला बाद केले. त्याला २१ चेंडूत फक्त २७ धावा करता आल्या. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची युवा फलंदाज जैस्वालने चांगलीच धुलाई करत आपले २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जैस्वालने यंदाच्या आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत जैस्वालने १८६ दुसरे स्थान पटकावले.
राजस्थान रॉयल्सला १२५ धावांवर दुसरा धक्का बसला, कर्णधार संजू सॅमसन १७ चेंडूत १७ धावांची खेळी करून तुषार देशपांडेचा बळी ठरला.त्यानंतर ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिकल यांनी अंतिम २ षटकात स्फोटक फलंदाजी करत चेन्नईला विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य दिले आहे.





