आसारामला उच्च न्यायालयाकडून दिलासा, पुन्हा 1 जुलैपर्यंत अंतरिम जामीन

जोधपूर – जोधपूर आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला गुजरातनंतर आता राजस्थान उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन १ जुलैपर्यंत वाढवला आहे.
उच्च न्यायालयाने आसारामला सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या अटींचे पालन करण्यास सांगितले आहे. सोमवारी न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. जेव्हा न्यायालयाने आसारामला ३० जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला तेव्हा त्याच्या वकिलांनी शेवटच्या दिवशी सुट्टी असल्याने १ जुलैपर्यंत जामीन देण्याची विनंती केली.
आसाराम १४ जानेवारी ते ३१ मार्च पर्यंत अंतरिम जामिनावर होता. हा कालावधी संपल्यानंतर, १ एप्रिल रोजी आसारामने आत्मसमर्पण केले. त्याच रात्री त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अजूनही तिथेच दाखल आहे.





