Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमधील सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपचे कमळ फुलले ; नेते म्हणाले,”राज्यात आता बल्ले..बल्ले..”

Rajasthan Election Result 2023 : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान मोजणीला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला मतदारांनी पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून आता भाजपच्या नेत्यांनी आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
राजस्थानमधील मतमोजणीच्या निकालावर भाजपचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यांनी,”भाजपा या निवडणुकीत मोठ्या बहुमताने जिंकेल. जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला आहे. राजस्थानच्या जनतेनं या निवडणुका काँग्रेसला सत्तेतून पायउतार करण्यासाठी लढल्या होत्या” असे म्हटले आहे.
#WATCH | Union minister and BJP leader Gajendra Singh Shekhawat says, “BJP will win with a huge majority in Rajasthan. Jadugar ka jadoo khatam ho gaya hai. In MP, the BJP will form govt with a 2/3 majority. In Chhattisgarh, the party will form the govt.” pic.twitter.com/G2kO36kHlu
— ANI (@ANI) December 3, 2023
तर दुसरीकडे भाजपा नेते जयवीर शेरगिल यांनी राज्यात भाजपासाठी आता “बल्ले बल्ले” परिस्थिती असल्याचे म्हटले आहे.
VIDEO | “It is going to be ‘balle balle’ for the BJP. The BJP’s score is going to be 3-0,” says BJP leader @JaiveerShergill as initial trends suggest lead for the BJP in MP and Rajasthan. #AssemblyElectionsWithPTI
(Full video is available on PTI Videos -… pic.twitter.com/m1oniQMIi3
— Press Trust of India (@PTI_News) December 3, 2023
त्यासोबतच ‘भाजपचा स्कोअर 3-0 होणार आहे.’सुरुवातीच्या ट्रेंडवरून अंदाज लावला जाऊ शकतो की मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला आघाडी मिळत आहे.असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे जवळपास 13 हजार मतांनी पुढे आहेत.





